esakal | जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग  ; कोकणात या गावात होणार संदिग्ध रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरू ....
sakal

बोलून बातमी शोधा

This is the first experiment in the district to start a quarantine center at the village level

चिपळूण तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग  ; कोकणात या गावात होणार संदिग्ध रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरू ....

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी)  : कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे दाखल होणार्‍या रूग्णांना अपुर्‍या सुविधा मिळतात. त्यामुळे संदिग्ध रूग्णांना कोव्हिंड सेंटरमध्ये न पाठवता गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्याचा निर्णय कळंबस्ते येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. कोव्हिड सेंटरवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती कळंबस्ते गावचे उपसरपंच विवेक महाडिक यांनी दिली. गाव पातळीवर क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. 


चिपळूण तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संदिग्ध रूग्णांसह त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. त्यांच्यावर येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार केले जाते. मात्र कामथे उपजिल्हा रूग्णालय आणि पेढांबे येथील मंदार संस्थेच्या इमारतीत सुरू केलेल्या सेंटरमध्ये रूग्णांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. अशी तेथे दाखल झालेल्या रूग्णांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. अनेक राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने शासकीय अधिकारी, आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन कोव्हिड सेंटरचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. काहींनी कोविड सेंटरला अचानक भेटी देवून तेथील परिस्थिती शासकीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

हेही वाचा- चाकरमान्यांनो गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या ;  यांनी केले आवाहन.... -

मात्र तेवढ्यापुरता दर्जा सुधारला जातो. नंतर परिस्थिती जैसे थे राहते. त्यामुळे कळंबस्ते गावाने गावातच कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कळंबस्ते ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा कृती दल आणि तंटामुक्त समितीच्या पदाधिकार्‍यांची नुकतेच बैठक झाली. या बैठकीत सरपंच अक्षता गमरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय गमरेसह गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.


श्री. महाडिक म्हणाले, संदिग्ध कोरोनाबाधित रूग्णांना नेण्यासाठी गावात रूग्णवाहिका दाखल झाली की संबंधित कुटूंबात आणि गावात भितीचे वातावरण पसरते. क्वारंटाईन सेंटर किंवा कोव्हिंड सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर तेथे पुरेसे लक्ष दिले जात नाही. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रूग्णांसारखीच वागणूक संदिग्ध रूग्णाना दिली जाते. त्यामुळे भितीने संदिग्ध रूग्ण दगावण्याची भिती जास्त असते. कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असेल तर त्याच्यावर शासकीय सेंटरमध्ये उपचार होईल. मात्र संदिग्ध रूग्णांवर आम्ही आमच्या गावातच उपचार करू. त्यासाठी प्राथमीक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून दिली जातील. रूग्णांच्या नातेवाईकांना लांबून भेटता येईल. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करता येईल. 


हेही वाचा- ऑनलाईन जाहिराती पाहताय तर ही बातमी वाचाच... -

संदिग्ध रूग्ण सापडला तर त्याला आम्ही आमच्या गावातच क्वारंटाईन करून उपचार करू. मात्र कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर शासनाच्या उपचार केंद्रातच उपचार होईल. रविवारी श्रमदान करून शाळा स्वच्छ केली जाईल.  सोमवार पासून गावात क्वारंटाईन सेंटर सुरू करू. 

विवेक महाडिक, उपसरपंच कळंबस्ते


संपादन - अर्चना बनगे

loading image