कृषी संशोधन केद्राने विकसित केलेल्या या काळ्या तिळाच्या नवीन जातीमध्ये तेलाचे प्रमाण ४० ते ४२ टक्के असणार आहे.
रत्नागिरी : कोकणातून नामशेष होणाऱ्या लांबड्या काळ्या तिळावर कोकण कृषी विद्यापीठ (Kokan Agricultural University) अंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राने (Agricultural Research Center) संशोधन करून काळ्या तिळावर (Black Sesame Seed) संशोधन पूर्ण झाले आहे. १०३ वर्षे कार्यरत असलेल्या शिरगाव संशोधन केंद्रातून काळ्या तिळावर हा पहिलाच प्रयोग आहे. पाच जिल्ह्यात याची चाचणी पूर्ण झाली असून, यावर्षी शेतकऱ्यांसाठी (Farmers) प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.