Mango Box : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली आंबा पेटी पुण्याला रवाना

गावखडीतील पावसकर बागायतदार; वेगळा प्रयोग, २० हजार भावाची अपेक्षा
first mango box of Ratnagiri district left for Pune 20 thousand price expected
first mango box of Ratnagiri district left for Pune 20 thousand price expectedsakal

रत्नागिरी : जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात रवाना झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतून सहदेव पावसकर यांच्या बागेतून ही पेटी रवाना झाली. चार डझनांच्या या आंबा पेटीला २० हजारांचा भाव मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे बाजारापेठेसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे पावसकर यांनी या वेळी वेगळा प्रयोग करत काही कलमांवर त्यांनी शेड मारली. त्यामुळे अवकाळी पावसातही कलमे सुरक्षित राहून आता त्याचे फळ त्यांना मिळाले.

यंदाच्या आंबा हंगामानेही बागायतदारांना चिंता लावली आहे. सुरुवातीला कलमे चांगली मोहरली. मोहर चांगला आल्याने बागायतदारांने तो टिकून राहावा, यासाठी फवारणी केली. मात्र निसर्गाचे दृष्टचक्र कायम होते. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांच्या स्वप्नावर विरजन घातले. मोहर मोठ्या प्रमाणात गळाला.

त्यानंतर थंडी कमी जास्त होऊन विचित्र वातावरण निर्माण झाले. रात्री कडक थंडी आणि दुपारचे कडक ऊन, असे वातावरण होते. त्याचा फळधारणेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे यंदाही आंबा उत्पादनात मोठी घट होईल, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.

परंतु काही बागायतदारांनी निसर्गावर मात करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी गावखडीतील सहदेव पावसकर हे एक आहेत. त्यानी या अवकाळी पावसापासून कलमांचे रक्षण व्हावे, म्हणून काही कलमांवर शेड मारले आहे.

शेडमुळे कलमं सुरक्षित राहून चांगली फळधारणा झाली. आज त्यांच्या बागेती या सुरक्षित कलमांचे फळ तोडायला आहे. त्यांनी जिल्ह्यातील पहिली ४ डझनची आंबा पेटी पुण्याला पाठविली आहे. सहदेव पावस्कर यांची चार महिन्यांपासून यासाठी मेहनत घेतली होती.

गोळपमधूनही आंबा मुंबईला रवाना

गोळप येथील बावा साळवी यांनीही दोन डझनचा बॉक्स मुंबईत रवाना केला. त्यांचा दर अजूनही निश्चित झाला नाही. पावसापासून मोहोर वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केल्याचे साळवी यांनी सांगितले.

आता ज्या आंब्याची तोड झाली आहे, तो साधारण सप्टेंबरमध्ये मोहरलेल्या कलमांचा आहे. पावसामुळे सुरुवातीला तो मोहर गळला. परंतु नंतर आम्ही कलमांवर शेड मारली. त्यामुळे अवकाळी पावसातही त्या कलमांना बाधा

झाली नाही. तो मोहर वाचला आणि आता ते फळ तोडायला आले. तयार झालेले हे फळ तोडले असून ४ डझनची पेटी पुणे मार्केटला पाठवत आहे. या पेटीला सुमारे २० हजार रुपयाचा दर मिळेल अशी अपेक्षा आहे.

- सहदेव पावसकर, आंबा बागायतदार गावखडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com