मलबार पाइड हॉर्नबिलचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून या कालावधीत असतो. हे पक्षी आयुष्यभरासाठी एकाच जोडीदारासोबत राहतात.
दापोली : दापोलीत मलबार पाइड हॉर्नबिलच्या (Malabar Pied Hornbill Bird) पहिल्या घरट्याचा शोध जालगाव येथे वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर संघटनेने (Wild Animal Rescue Organization) लावला आहे. त्या घरट्याला संरक्षित करण्याचे काम संघटनेमार्फत सुरू आहे. जालगाव येथील नंदकुमार झाडेकर यांच्या बहिणीच्या घराच्या बाजूच्या झाडावर हे घरटे सापडल्याचे वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर संघटनेचे सचिव तुषार महाडिक यांनी सांगितले.