रत्नागिरीः भीषण अपघातात मासे विक्रेत्या महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पिक टेम्पो आणि रिक्षा यांच्यात समोरा - समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मासे विक्रेत्या महिलेचा मृत्यू ओढवला, तर रिक्षा चालक जखमी झाला. हा अपघात शहरातील जे. के. फाईल्स रस्त्यावर (शुक्रवारी) सकाळी सहा वाजता झाला.

रत्नागिरी - पिक टेम्पो आणि रिक्षा यांच्यात समोरा - समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मासे विक्रेत्या महिलेचा मृत्यू ओढवला, तर रिक्षा चालक जखमी झाला. हा अपघात शहरातील जे. के. फाईल्स रस्त्यावर (शुक्रवारी) सकाळी सहा वाजता झाला. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. 

फरिदा अब्दूलअजिज जिवाजी (वय 60, रा. खडप मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार जावेद आदम फकिर (वय 34, रा. उक्ताड, चिपळूण) हे टेम्पो (क्र. एचएच-08 डब्ल्यू 1497) घेऊन चिपळूणहून रत्नागिरीकडे येत होते. ते जे. के. फाइल्स येथे आले असता रत्नागिरीहून हातखंबा येथे जाणाऱ्या रिक्षाची (क्र. एमएच -08 3618) समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला.

या रिक्षातून चालक अजगरअल्ली युनुसखान पठाण (वय 50, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) हे मासे विक्रेती फरिदा यांना घेऊन हातखंबा येथे जात होता. चालकासह महिलाही गंभीर जखमी झाली. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पठाण यांच्यावर उपचार सुरु आहेत, तर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish Seller Women Dead In An Accident In Ratnagiri