सागरी किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये मत्स्य व्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण झाल्यास अशा प्रकारच्या सेझमधील तो जिल्हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे.
रत्नागिरी : राज्याला ७२० किलोमीटर सागरीकिनारा लाभला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्यासंदर्भात मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांच्या अध्यक्षतेखाली पहिले सादरीकरण करण्यात आले. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील ठराविक भागाचा अभ्यास होणार आहे. भारतातील पहिले एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्यासंदर्भातील बैठकीत हे सादरीकरण झाले.