मच्छीमारावर काळाचा घाला ; जाळे ओढताना समुद्रात पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

मालवण (सिंधुदुर्ग) : मासेमारीचे जाळे ओढत असताना तोल जाऊन समुद्रात पडल्याने शंकर सखाराम फोंडबा (वय ५७, रा. सर्जेकोट) या मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. याची खबर नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सर्जेकोट येथील माऊली कृपा यांच्या मासेमारीच्या पातीवरून कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी ते गेले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान मासेमारीचे जाळे ओढत असताना शंकर फोंडबा  तोल गेल्याने 
समुद्रात पडले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती 
नितीन परुळेकर यांनी पोलिस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर हे करत आहेत.

हेही वाचा - शिवसेनेचा ग्रामपंचायतीवरील वरचष्मा कमी करण्यात भाजप यशस्वी होईल का? 

 

संपादन - स्नेहल कदम 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fisherman dead in ratnagiri tapped out net from sea