esakal | मत्स्य विद्यापीठ संलग्नता विधेयक विधानसभेत
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्य विद्यापीठ संलग्नता विधेयक विधानसभेत

रत्नागिरी - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला संलग्न राहण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश विधेयकाच्या रूपाने अधिवेशनात मांडला. सहा महिन्यांनी राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयक रूपाने अधिवेशनात हा मुद्दा मांडल्याने संलग्नता आणि पदव्या ग्राह्य धरण्याच्या मागण्यांना मूर्तरूप मिळाले.

मत्स्य विद्यापीठ संलग्नता विधेयक विधानसभेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला संलग्न राहण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश विधेयकाच्या रूपाने अधिवेशनात मांडला. सहा महिन्यांनी राज्यपालांच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. विधेयक रूपाने अधिवेशनात हा मुद्दा मांडल्याने संलग्नता आणि पदव्या ग्राह्य धरण्याच्या मागण्यांना मूर्तरूप मिळाले.

शिवसेनेचे ‘म्हाडा’चे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्यासह आमदार राजन साळवी यांनी मत्स्य महाविद्यालय प्रश्‍नावर आपापल्या परिने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आज विधानसभेत महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा, १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कायदा, १९९८ ह्या दोन्ही कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचे विधेयक राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडले.

नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य शासनाने १२ जून २०१९ ला अध्यादेश काढून उपरोक्त कायद्यांच्या कलम ९ मध्ये सुधारणा केली होती. तो अध्यादेश विधेयक स्वरूपात विधानसभेसमोर मांडण्यात आला. या सुधारणेमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने २००० पासून राज्यपालांच्या संमतीने प्रदान केलेल्या पदव्या विधिग्राह्य धरण्यात येतील. तसेच मत्स्यशास्त्र या विषयात कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र पदवी प्रदान करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. कोकण कृषी विद्यापीठांतर्गत सध्या कार्यरत असलेले शिरगाव मत्स्य महाविद्यालय आणि इतर सहा संशोधन संस्था याच विद्यापीठांतर्गत राहतील अशी सुधारणाही केली गेली. पुढील सहा महिन्यांमध्ये राज्यपालांच्या आदेशाने या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार असून त्यानंतर कायदा लागू होईल. त्यामुळे कोकणवासीयांचा हा प्रश्न कायमचा सुटला आहे. हे विधेयक विधानसभेत मांडल्याबद्दल विधिमंडळातील शिवसेना कोकण पक्षप्रतोद आमदार साळवी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे आभार मानले.

loading image