गणपतीपुळे समुद्रात मासेमारी नौका खडकावर आदळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

- मोठा अनर्थ टळला
- दहा खलाशांना वाचवण्यात यश
- दहा लाखांचे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी ‘निसणघाटी’ या ठिकाणी साखरतर येथील मच्छिमारी नौका दुर्घटनाग्रस्त झाली. बोटीच्या पंख्यामध्ये मासेमारी जाळे अडकल्याने नौका समुद्रातील खडकावर आदळली. खडकावर आदळल्याने नौकेला भलेमोठे भगदाड पडले. बोटीतील खलाशांनी प्रसंगावधान राखत नौका किनाऱ्यापर्यंत आणली. परंतु, या दुर्घटनेत नौकेचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. 

साखरतर येथे राहणाऱ्या मेहताब साखरकर यांच्या मालकीची बोट गुरूवारी पहाटेच्या सुमारास मच्छिमारीसाठी समुद्रात उतरली होती. मासेमारीसाठी बोटीतील खलाशांनी जाळे समुद्रात सोडले होते. परंतु, जाळे ओढत असताना जाळे बोटीच्या पंख्यामध्ये अडकल्याने बोट अचानक बंद पडली. अलीलक्ष्मी या नौकेचे इंजिन बंद पडल्याने ही नौका लाटांच्या तडाख्यात सापडली. लाटांच्या तडाख्याने नौका खडकावर जाऊन आदळली आणि फुटली.

नौका फुटल्याने एकच गोंधळ उडाला. या बोटीवर दहा खलाशी होते. प्रसंगावधान राखत खलाशांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नौका किनाºयापर्यंत आणली. गणपतीपुळे येथील निसणघाटी येथे समुद्रकिनारी नौका उभी करण्यात आली. 

खडकावर आदळून बोट आदळल्याने बोटीच्या मध्यभागी भगदाड पडले असून बोटीला चिर गेली आहे. बोट फुटल्याने बोटीतील पकडलेली सर्व मासळी वाहून गेली. बोटीवरील दहा खलाशी सुखरूप किनाºयावर परतल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर बोटीवरील जाळी काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दुर्घटनाग्रस्त नौका किनाºयावर आणण्यासाठी गणपतीपुळे, भंडारपुळे येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांनी मदतकार्य केले. 

या दुर्घटनेची खबर तत्काळ जयगड पोलिस आणि मत्स्य खात्याच्या अधिकाºयांना देण्यात आली. मत्स्य खात्याचे परवाना अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच जयगड पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. 

पाण्याला अद्यापही करंट
समुद्रातील वादळी वातावरण अद्यापही शांत झालेले नाही. समुद्राच्या पाण्याला अद्यापही करंटच आहे. प्रशासनानेही अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना केल्या होत्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने एका आठवड्यात बोट दुर्घटनाग्रस्त होण्याची दुसºयांदा वेळ आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fishing boat hit on stone in sea in Ganpatipule