
दापोली : उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. गेले आठ दिवस वाऱ्यामुळे मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळीही मिळालेली नाही. ऐन हंगामात जोरदार वारे आणि मासळी मिळत नसल्याने मोठा फटका व्यावसायिकांनाही बसला आहे. येथील बंदरावर भरणाऱ्या बाजारातही शुकशुकाट आहे. रामनवमीनंतर (६ एप्रिल) मासळी मिळेल, अशी आशा मच्छीमारांना वाटत आहे.