पंढरपूर ते मालवण जाणारी मोटार उलटल्याने आतील प्रवासी जखमी झाले, तर दुसऱ्या मोटारीचे चालक आनंद देविदास येलकर यांची अपघातानंतर प्रकृती खालावली.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) वागदे येथे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर जात उलटली तर त्याच लेनवरून गोव्याकडे जाणाऱ्या मोटार चालकाने (Car Accident) त्याचक्षणी ब्रेक लावल्याने ती विरुद्ध लेनवर जाऊन थांबली. उलटलेल्या मोटारीतील पाच जण जखमी झाले असून, यातील एक गंभीर आहे. हे सर्व प्रवासी सर्जेकोट (ता. मालवण) येथील असून, ते पंढरपूर येथे माघवारीसाठी गेले होते.