कोकण विभागात पूर परिस्थिती नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला आहे. या भागातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून, त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे. 

मुंबई : कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला आहे. या भागातील पूर परिस्थिती नियंत्रणात असून, त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 व्यक्ती, रत्नागिरी जिल्ह्यातील 757 तर रायगड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. सध्या नागरिक आपापल्या घरी जात आहेत. त्यांना अन्न धान्याचे वितरण व गरजेप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. शासकीय आर्थिक मदत वाटप करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या दोन तात्पुरता निवारा कँम्प सुरू आहे. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सैन्य दलाच्या टीम अन्यत्र पाठविण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Situation Controlled in Kokan Region