कुडाळ तालुक्यात या नदीवरील पुल पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

पणदूर, मयेकरवाडी येथील सुरेश शांताराम शिरोडकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घर आणि दुचाकीचे नुकसान झाले. 
तालुक्‍यात गेले आठ दिवस पाऊस थांबला होता.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - गेले काही दिवस श्रावणात ऊन पावसाचा खेळ करणाऱ्या पावसाने तालुक्‍यात मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या वादळी वारे व मुसळधार पावसामुळे येथील भंगसाळ नदीचे जुने पूल पाण्याखाली गेले. आंबेडकरनगराला पाण्याने वेढले.

पणदूर, मयेकरवाडी येथील सुरेश शांताराम शिरोडकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घर आणि दुचाकीचे नुकसान झाले. 
तालुक्‍यात गेले आठ दिवस पाऊस थांबला होता. श्रावणातील उन पावसाचा खेळ सुरू होता; मात्र काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील भंगसाळ नदीचे जुने पूल पाण्याखाली गेले.

आंबेडकरनगरांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही घरांना पाण्याने वेढले. भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाबरोबरच वादळी वाऱ्यामुळे पणदूर, मयेकरवाडी येथील श्री सुरेश शांताराम शिरोडकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घर आणि तीन दुचाकीचे नुकसान झाले. पणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच दादा साईल यांनी पाहणी करून आढावा घेतला. 

 

संपादन - राजेंद्र कृष्णराव घोरपडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Water On Bridges OF Bhangsal River Sindhudurg Marathi News