पूरग्रस्त भागाचे पंचनामे त्वरीत करा; तटकरेंच्या सूचना

पूरग्रस्त भागाचे पंचनामे त्वरीत करा; तटकरेंच्या सूचना

खेड (रत्नागिरी) : शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी (ता. १) राज्यमंत्री आदिती तटकरे (Minister of State Aditi Tatkare) यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी तटकरे सभागृह येथे पूरग्रस्त नागरिकांना धान्य वाटप करण्यासाठी मदत खेड (Khed) शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे (Nationalist Congress Party) देण्यात आली. अधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. पूरग्रस्त भागाचे व शेतीचे पंचनामे लवकरच पूर्ण करावे, अशीही सूचना त्यांनी केली.

शहरातील पूरग्रस्त भागाची रविवारी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी केली. बाजारपेठ, सफा मशीद चौक, पानगल्ली, तीनबत्ती नाका, दापोली नाका, नारंगी नदी परिसराची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पूरग्रस्त भागाचे व शेतीचे पंचनामे लवकरच पूर्ण करावे. उपविभागीय अधिकारी अविषकुमार सोनोने यांना सदर शेतीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवा, असे आदेश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अजय बिरवटकर, तालुकाध्यक्ष स. तू. कदम, शहराध्यक्ष सतीश चिकणे, युवक अध्यक्ष अॅड. अश्विन भोसले, युवती अध्यक्ष समीक्षा कदम, नगरसेवक अजय माने, राजू संसारे, तौसिफ खोत, इलयास खतीब, भूषण चिखले व जयमाला पाटणे, युवती शहराध्यक्ष अॅड. पूजा तलाठी, जलाल राजपुरकर, तुषार सापटे, सुनील साळोखे, मनोज कदम, प्रणव म्हापुसकर, इम्तियाज खोत व अधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्त भागाचे पंचनामे त्वरीत करा; तटकरेंच्या सूचना
व्यावसायिकांना 'खास पॅकेज' द्या ; धैर्यशील माने यांची मागणी

रसायन नदीत सोडले

लोटे एमआयडीसीने पुराचा फायदा घेऊन रसायन नदीमध्ये सोडलेले असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी आदिती तटकरे यांच्याकडे केली. यावर तटकरे यांनी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणी करून त्याचा अहवाल घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com