esakal | राजापूर शहराने टाकला सुटकेचा निश्वास, जनजीवनही पूर्वपदावर
sakal

बोलून बातमी शोधा

 The floods in Rajapur subsided

परिणामी शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अनेक अंतगंत रस्त्यासह परिसरातील गावांना जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेले होते.

राजापूर शहराने टाकला सुटकेचा निश्वास, जनजीवनही पूर्वपदावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) - दोन दिवसाच्या संततधारा पडणाऱ्या पावसाने काल ता. 18 रोजी सायंकाळी उशिरापासून काहीशी विश्रांती घेतल्याने राजापूर शहराला अर्जुना-कोदवली नद्यांना आलेला पूर काल (ता.17) रात्री उशिरा ओसरला. त्यामुळे पूरस्थितीमुळे विस्कळीत झालेले शहरासह परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. दरम्यान, तालुक्‍यातील कोंडतिवरे आणि ओझर येथे घर आणि गोठ्यांचे अंशतः नुकसान झाले. 

गेले दोन दिवस तालुक्‍यामध्ये सततधारा पाऊस पडत होता. त्यातून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडून या दोन्ही नद्यांना पूर येवून शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. परिणामी शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अनेक अंतगंत रस्त्यासह परिसरातील गावांना जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेले होते.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आलेल्या पूरस्थितीने बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. मात्र, आधीच सतर्क असल्यामुळे व्यापाऱ्यांचे फारसे कोणाचे नुकसान झालेले नाही. काल ता. 18 रोजी दुपारनंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेली पूरस्थिती सायंकाळी उशिरा कमी झाली. त्यातून, दोन दिवसानंतर शहरातील जवाहरचौक आणि कोदवली नद्याच्या काठावरील टपऱ्यांनी काहीसा मोकळा श्‍वास घेतला. दरम्यान, शिवाजी पथसह शहरातील अन्य भागातील पूराच्या पाण्याखाली असलेले रस्ते वाहतूकीसाठी आज ता. 19 रोजी मोकळे झाले होते. शहरानजीकच्या शीळ-गोठणेदोनिवडे मार्गावरील काल दिवसभर पाण्याखाली असलेला रस्ता आजपासून वाहतूकीसाठी मोकळा झाला होता. 

नुकसानीचे पंचनामे सुरु 
संततधारा पावसामध्ये तालुक्‍यातील ओझर, कोंडतिवरे आणि अणसुरे येथे घर, गोठा यांचे अशंतः नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. त्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले होते. 

संपादन - राहुल पाटील

loading image