Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

सुधागडात अवैध खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा साठा, दोन वाहने जप्त, चार जण अटकेत
Forest department action against Khair wood smugglers in Sudhagad

Forest department action against Khair wood smugglers in Sudhagad

Sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यात सुरू असलेल्या खैर लाकडाच्या अवैध तस्करीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. धोंडसे आणि सिद्धेश्वर परिसरात वनविभागाने सापळा रचून दोन वाहनांसह लाखो रुपयांचा खैर लाकडाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान तस्करांवर संतापलेल्या स्थानिक ग्रामस्थांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला असून, तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी अंगावर घातल्याने संतप्त जमावाने तस्करांच्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com