बिबट्याची ओळख पटवण्याचा वनविभागाचा `रोजेट पॅटर्न' 

Forest Department RoJet Pattern To Identify Leopards
Forest Department RoJet Pattern To Identify Leopards

रत्नागिरी - जंगलावर अधिराज्य गाजविणारा बिबट्या अन्नसाखळीतील महत्वाचा घटक परंतु बिबट्यांना उपजीविका भागविताना मोठी कसरत करावी लागली आहे. मानवी वस्तीच्या जवळ असणारा आणि सहज भक्ष्याला पकडण्यावर भर देणारा हा प्राणी आहे. बिबट्याचे हे धाडस त्याच्या जिवावर बेतत आहे. गेल्या दहा महिन्यात सात बिबटे विहिरीत पडले तर अन्य एक फास्कीत अडकला. आठही बिबट्यांना जीवदान देण्यात वनविभागाला यश आले. जीवदान दिलेल्या या बिबट्यांची फेरओळख पटविण्यासाठी वनविभाग "रोजेट पॅटर्न'चा अवलंब करतो. बिबट्याच्या अंगावरील गोल ठिपक्‍या, वर्ण, रचनेतील बदल यावरून वनविभाग बिबट्यांची ओळख पटते. 

जंगलांचा प्रचंड ऱ्हास होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र जिल्ह्यात हे चित्र नाही. जिल्ह्यात चांगले वनक्षेत्र आहे पण बिबट्या हा मानवी वस्तीच्या आसपास राहणारा प्राणी आहे. कुत्रे, पाळीव जनावरे आदी सहज मिळणाऱ्या शिकारींवर तो आपली उपजीविका भागवतो. गेल्या दहा महिन्यांमध्ये सात बिबट्यांच्या जिवावर अशी शिकार बेतली. हे बिबटे विहिरीत पडले. एक फास्कीत अडकला, अशा आठ बिबट्यांना वनविभागाने पिंजरा लावून सुरक्षित काढले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले. नाखरे येथे विहिरीत पडून मृत झालेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले. 

सापडलेल्या बिबट्यांना टॅग लावण्याची पद्धत येथे नाही. त्यामुळे एकदा पकडलेला बिबट्या परत सापडल्यास तोच आहे की नाही हे समजण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. "रोजेट पॅटर्न' या तंत्राचा अवलंब करून बिबट्यांची ओळख वनविभाग आपल्याकडे ठेवते. बिबट्याच्या अंगावरील गोल ठिपके एकसारखे नसतात. त्यातील बारकावे, त्यांचा वर्ण, रचनेतील बदल यावरून वनविभागाला बिबट्यांची ओळख पटते. 

बिबट्यांची ओळख पटण्यासाठी टॅग लावण्याची पद्धत आपल्याकडे नाही; मात्र आपण बिबट्यांची ओळख राहण्यासाठी "रोजेट पॅटर्न'चा वापर करतो. त्यामुळे पकडलेला बिबट्या परत सापडल्यास त्याची ओळख पटते. गेल्या दहा महिन्यात आम्ही विहिरीत पडलेल्या सात बिबट्यांना जीवदान दिले. 
- प्रियांका लगड, 
परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com