पाली - म्हसळा येथील देहेन वन रोपवाटिका जवळील राखीव वन परिसरात रोहा वनविभागामार्फत नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी पर्यटकांनी वन परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. .उपवनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव, सहाय्यक उपवनसंरक्षक रोहित चौबे, आणि म्हसळा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे यांच्यासह भारत सरकारचे स्वच्छ भारत मिशन माणगांवचे ब्रँड अॅम्बेसेडर शंतनु कुवेसकर, सहकारी मित्र उमेश देशमुख व म्हसळा वनविभागातील वनपाल आणि वनरक्षक यांची या अभियानास उपस्थिती होती.वन परिसरातून गोळा केलेल्या प्लास्टिक च्या बाटल्या, व इतर प्लास्टिक कचरा, मद्याच्या बाटल्या रीसायकलिंग साठी देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर वन परिसरांमधून रस्त्यानजीक अश्या प्रकारचे स्वछता अभियान महिन्यातून एकदातरी राबवले गेल्यास स्थानिकांमध्ये व पर्यटकांमध्येदेखील स्वछतेबाबत जागरूकता निर्माण होईल असे स्थानिक सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे, सदरचे अभियान कोणत्याही पूर्वनियोजनाविना वनपरिसराची पाहणी करत असताना वनाधिकाऱ्यांकडून राबवण्यात आले..कचरा व मद्याच्या बाटल्यारायगड जिल्ह्यात पावसाळी निसर्ग पर्यटन तसेच समुद्रकिनारी देखील उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असते, येथे येणारे पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात परंतु जैवविविधतेने समृद्ध असलेल्या परिसरांतून जात असताना रस्त्याशेजारी किंवा मग वन परिसरात वाहनातूनच किंवा प्रवासातून क्षणभर विश्रांतीसाठी थांबले असताना काही पर्यटकांकडून येथे प्लास्टिकचा कचरा टाकला जात आहे. तसेच काही मद्यप्रेमी पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या देखील टाकल्या जात आहेत..नागरिक व पर्यटकांनी शिस्त पाळापर्यटकांकडून येथील पर्यावरण आणि सुंदर परिसरात कचरा होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. स्थानिक नागरिक तसेच जागरूक पर्यटकांनी अशाप्रकारे कोणी कचरा करताना निदर्शनास आल्यास, प्रथम त्यांना समजावून सांगत स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा अथवा स्थानिक प्रशासनास संपर्क साधावा असे आवाहन माणगाव चे स्वच्छ भारत मिशन चे ब्रँड अॅम्बेसेडर शंतनु कुवेसकर यांनी केले आहे..रायगड जिल्ह्यात दक्षिणेकडील रोहा, माणगांव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन व मुरूड या आठ तालुक्यांचा समावेश रोहा वनविभागाचे कार्यक्षेत्रात होतो. सदर कार्यक्षेत्रातील वनपरीसर जैवविविधतेने अतिशय समृध्द व संवेदनशील असून येथील वनसंपदेला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार याची खबरदारी पर्यटकांकडून घेण्याचे अपेक्षित आहे, वनविभाग वनपरिसरात स्वच्छता राखून येथील नैसर्गिक अधिवास अबाधित राखत वनसेवेसाठी तत्पर आहे.- शैलेंद्रकुमार जाधव (भा.व.से.), उपवनसंरक्षक रोहा.वनपरिसरात स्थानिक नागरिक अथवा पर्यटक कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार तसेच कचरा टाकताना आढळून आल्यास, त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात वनविभाग सक्षम आहे, नागरिकांनी वनपरिसातून जात असताना व पर्यटन करत असताना जबाबदारीने वागावे. यासाठी वनविभागाकडून योग्य त्या व शक्य तितक्या उपाययोजना केल्या जातील.- रोहित चौबे, सहाय्यक उपवनसंरक्षक, रोहा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.