रत्नागिरी जिल्ह्यात 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 July 2020

जिल्ह्यात आज आणखी 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी - गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1661 झाली आहे. जिल्ह्यात आज आणखी 4 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मुरडव, संगमेश्वर येथील एका 45 वर्षीय रुग्णाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. सदर रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पेठकिल्ला, रत्नागिरी येथील 40 वर्षीय कोरोना रुग्ण तसेच मिरकरवाडा, रत्नागिरी येथील 40 वर्षीय महिला कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कालुस्ते, चिपळूण येथील 80 वर्षीय कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 57 झाली आहे.

  • नव्याने सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी 16,
  • उपजिल्हा रुग्णालय कामथे 20, कळबणी, खेड 2,
  • गुहागर 5 येथील रुग्णांचा समावेश आहे.
  • आज 48 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1102 झाली आहे. आज बरे झालेल्यां मध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 3, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 3, उपजिल्हा रुग्‍णालय कामथे 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 7, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 19, आणि 13 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forty three new corona patient found in ratnagiri district