esakal | सागरी महामार्गासाठी साडेचार हजार कोटी मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

Four and a half thousand crore sanctioned for maritime highway

निसर्ग चक्रीवादळानंतर आलेल्या जास्त आलेल्या विजेच्या बीलांमुळे महावितरणविषयी ग्राहकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे.

सागरी महामार्गासाठी साडेचार हजार कोटी मंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महाविकास आघाडी सरकार अनुकूल असून या कामासाठी 4 हजार 500 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) या महामार्गाचे काम केले जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

तटकरे म्हणाले, या महामार्गासंदर्भात एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांचेसोबत आपली बैठकही झाली आहे. यामध्ये सावित्री नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करणे तसेच वेळास केळशी जोडणाऱ्या पुलांसदर्भातही चर्चा करण्यात आली. या सागरी महामार्गावर असलेल्या खाड्‌यांवर पूल बांधण्याचे काम या सागरी महामार्गाच्या कामात अंतर्भूत आहे.

आंजर्ले ते आडे दरम्यान सावणे येथे समुद्र किनाऱ्याजवळून जाणारा रस्ता खचला असल्याने या मार्गावरील एसटीची वाहतूक बंद झाल्याने आडे ते केळशी परिसरातील प्रवाशांना प्रवास करण्यास अडचणी येत असल्याबाबत तटकरे यांना पत्रकारांनी माहिती दिली असता बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुळे यांच्याशी तटकरे यांनी संपर्क साधून मंगळवारी (ता. 13) चिपळूण येथील बैठकीत या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन येण्यास सूचना दिल्या.

निसर्ग चक्रीवादळानंतर आलेल्या जास्त आलेल्या विजेच्या बीलांमुळे महावितरणविषयी ग्राहकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे महावितरणचे तांत्रिक संचालक यांच्याशी आपले बोलणे झाले असून दापोली येथील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने कॅम्प घ्यावेत असे आपण त्यांना सांगितले असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. 
बीएसएनएल व जिओ या मोबाईल कंपन्यांच्या कनेक्‍टिव्हिटी विषयी ग्राहकांच्या तक्रारी असून मंगळवारी (ता. 13) गुहागर येथे होणाऱ्या बैठकीस दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, संजय कदम, जयवंत जालगावकर, रउफ हजवानी, अजय बिरवटकर आदी उपस्थित होते.

हे पण वाचाछत्रपती घराण्यावरील टिका सहन केली जाणार नाही  

पर्यटनाचा आराखडा मंजुरीसाठी प्रयत्न 

दापोली हा पर्यटन तालुका असून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून इथला पर्यटनाचा आराखडा कसा मंजूर होईल, या तालुक्‍यातील गावांमध्ये पर्यटनाच्या सुविधा कशा प्रकारे निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करण्यात येईल. दापोलीला पर्यटनामध्ये राष्ट्रीय व जागतिक पातळीवर नेण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असेही तटकरे म्हणाले. 

संपादन - धनाजी सुर्वे