राजीनामे दिलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रोख रामदास कदमांकडे?

चारही पदाधिकारी कुणबी समाजातील असल्याने त्याचे दूरगामी परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
राजीनामे दिलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रोख रामदास कदमांकडे?
Updated on
Summary

चारही पदाधिकारी कुणबी समाजातील असल्याने त्याचे दूरगामी परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

दाभोळ : अहंकारी नेत्यांकडून कुणबी समाजाला कायम दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांचा सन्मान केला जात नसल्याचे कारण देत शिवसेनेच्या चार पदाधिकाऱ्यानी राजीनामे दिले. अहंकारी नेत्यामुळे समाजाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला तरी त्या नेत्याचे नाव घेतले नाही. त्यांचा रोख नक्की कोणाकडे, हे सांगितले नाही. मात्र, मतदारसंघात रामदास कदम यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. चारही पदाधिकारी कुणबी समाजातील असल्याने त्याचे दूरगामी परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सलग पाच टर्म निवडून येणारे शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी यांचा पराभव ‘राष्ट्रवादी’चे संजय कदम यांनी केल्यावर दळवी काही काळासाठी राजकीय विजनवासात गेले होते. २५ वर्षे शिवसेनेची दापोली व मंडणगड तालुक्याची सत्ता दळवी यांच्या ताब्यात होती. त्यांनी २५ वर्षांत समोर राजकीय प्रतिस्पर्धी तयारच होऊ दिला नाही. त्यानंतर रामदास कदम यांनी युवा नेते योगेश कदम यांना दापोली मतदारसंघात प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीअगोदरपासून सूर्यकांत दळवी यांचे खंदे समर्थक माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे व माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे यांनी त्यांची साथ सोडली होती.

राजीनामे दिलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रोख रामदास कदमांकडे?
'स्टंटबाजी कशी करावी? हे राणेंकडून शिकावे'

योगेश कदम यांच्या उदयानंतर हे दोघेही त्यांच्याबरोबर गेले. अनेकांनी सूर्यकांत दळवी यांची साथ सोडून योगेश कदम यांच्याबरोबर जाणे पसंत केले. त्यामुळे दळवी यांची शिवसेनेतील संघटनात्मक पकड सैल झाली व दापोलीचे संघटनात्मक नेतृत्व खेडमधील नेत्यांकडे गेले. दापोली मतदारसंघाची सूत्रे खेडकडे गेल्यावर संघटनात्मक नियुक्त्या, निवडणुकीतील उमेदवार यावर खेडचा प्रभाव होता.

कुणबी समाजात दोन गट

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून विधानसभा क्षेत्राध्यक्ष संदीप राजपुरे हे इच्छुक होते. मात्र, योगेश कदम यांनी बाजी मारत उमेदवारी मिळवली व ते निवडणूक जिंकलेही. त्यानंतर दापोलीतील कुणबी समाजभवन बांधण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाने शासनाकडे जागेची मागणी केली. नगरपंचायतीकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. शिवसेनेची सत्ता असूनही ना हरकत दाखला शिवसेनेतील कुणबी समाजातील पदाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या संस्थेला देण्यात आला होता. त्यामुळे कुणबी समाजात दोन गट निर्माण झाले.

राजीनामे दिलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा रोख रामदास कदमांकडे?
परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन लोकसेवा आयोगाची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Sangameshwar
Fun Trip Turns Fatal: Young Man Drowns in Well Near Pali
Unusual Discovery in Raigad: Rare Albino Alligator Gar Fish Found in River
Ganeshotsav 2026: Thane Enhances Konkan Railway Ticket Booking with Additional Counters
Marathi News Esakal
www.esakal.com