esakal | रत्नगिरी जिल्ह्यात चार नवीन कोरोना पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Four New Corona Positive Found In Ratnagiri District

ऑक्‍टोबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा दर कमी होऊ लागला आहे. शनिवारी (ता. 14) आलेल्या अहवालात 14 जणं बाधित होते. त्या दिवशीच्या चाचण्यांची संख्याही अधिक होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिवाळीमुळे चाचण्याचा आकडा पन्नासपेक्षाही खाली आला आहे.

रत्नगिरी जिल्ह्यात चार नवीन कोरोना पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - दिवाळीमुळे कोरोनाच्या चाचण्याची संख्याही घटली आहे. मागील चोविस तासात झालेल्या 39 जणांच्या चाचण्यात 4 कोरोना बाधित सापडले. तर एका बाधिताचा मृत्यू झाला असून सर्वात लहान वयाच्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्‍यातील एका मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा दर कमी होऊ लागला आहे. शनिवारी (ता. 14) आलेल्या अहवालात 14 जणं बाधित होते. त्या दिवशीच्या चाचण्यांची संख्याही अधिक होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिवाळीमुळे चाचण्याचा आकडा पन्नासपेक्षाही खाली आला आहे. सर्वचजण दिवाळी साजरा करण्याच्या मनस्थितीत असल्याने अनेकांचे कोरोनाकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता आहे.

रविवारी (ता. 15) प्राप्त झालेल्या अहवालातील 35 जणं निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांमध्ये दोघे आरटीपीसीआरमध्ये तर दोघे ऍण्टीजेनमधील आहेत. ते सर्व रुग्ण रत्नागिरी तालुक्‍यातील आहेत.

जिल्ह्यातील बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
गेल्या चोविस तासात 6 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्‍त होणाऱ्यांचा दर 94.49 टक्‍केवर पोचला आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरत आहे. तीन दिवसानंतर चिपळूण येथील एका 16 वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 219 वर पोचला आहे.

मृत्यू दर 3.71 टक्‍के आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्याचे वय सर्वसाधारणपणे 32 च्या पुढे आहे. त्यामध्येही 55 वर्षाच्या पुढे असलेल्याची संख्या सर्वाधिक आहे. चिपळुणातील मुलीचा मृत्यू ही धक्‍कादायक गोष्ट असून जिल्ह्यातील सर्वात लहान वयाच्या रुग्णाची पहिलीच नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यरत होता; मात्र टाळेबंदीतील शिथिलता मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे आव्हान आहे. 

एक नजर
एकूण बाधित 8,586 
एकूण निगेटिव्ह 50,813 
बरे झालेले रुग्ण 8,113 
एकूण मृत्यू 319 
उपचाराखालील रुग्ण 84