थोडक्यात : -रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्र किनारी पोहण्याचा मोह अनावर झाल्याने चौघांचा बुडून मृत्यू एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली.तीन तरुणी व एका तरुणाचा समावेश आहे..Swimming Tragedy Aarey Beach : रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्र किनारी पोहण्याचा मोह अनावर झालेल्या रत्नागिरीतील चौघांचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (ता. १९) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये तीन तरुणी व एका तरुणाचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. शहरातील ओसवालनगर येथील दोघे आणि मुंब्रा येथील दोघांचा यामध्ये समावेश आहे. या दुर्घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..जुनेद बशीर काझी (वय ३०), पत्नी जैनब जुनेद काझी (वय २८, दोन्ही रा. ओसवालनगर रत्नागिरी), उजमा शमशुद्दीन शेख (वय १७), उमेरा शमशुद्दीन शेख (वय १६, दोन्ही रा. मुंबई-मुंब्रा) अशी मृतांची नावे आहेत. काझी कुटुंबीय हे ओसवालनगर येथे भाड्याने राहतात. त्यांच्याकडे मुंब्रा येथील पाहुणे म्हणून उमेरा आणि उजमा या तरुणी आल्या होत्या.काल सायंकाळी ५ वाजता दुचाकी घेऊन ते आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले. समुद्र खवळलेला होता. दुपारी पावसाला सुरुवात झाली होती. त्यावेळी या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही. उसळणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही. अचानक उसळलेल्या लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्यांनी आकांत सुरू केला.काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. काही प्रत्यक्षदर्शीनी आरडाओरड सुरू केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचेही प्रयत्न असफल ठरले. सायंकाळी सात वाजता त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले..दरम्यान, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रुग्णालयात नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांची प्रचंड गर्दी होती. नातेवाईक एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत होते.सध्या पावसाळी वातावरण आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे पर्यटकांनी समुद्रात जाण्याचे धाडस करू नये. आरे-वारे समुद्रकिनारी यापूर्वीही अशा दुर्दैवी घटना घडल्या असल्यामुळे पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी.- राजेंद्र यादव, पोलिस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे.रत्नागिरीतील आरे-वारे समुद्र किनारी काय घडले?रत्नागिरीतील आरे-वारे समुद्र किनारी चार जणांचा समुद्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.आरे-वारे बिच सुरक्षित आहे का?आरे-वारे समुद्र किनारा निसर्गरम्य असला तरी काही भागात समुद्राचा प्रवाह तीव्र असतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.समुद्रकिनारी बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?पोहण्यासाठी फक्त परवानगी दिलेल्या भागातच जावे, स्थानिक गाईड किंवा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे समुद्रात उतरताना बचाव साधनांचा वापर करावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.