सावधान! तुम्हालाही २५ लाखाच्या लॉटरीचा मेसेज येतोय का ?

fraud message of 25 lakh rupees for people it's fraud message in dabhol ratnagiri
fraud message of 25 lakh rupees for people it's fraud message in dabhol ratnagiri
Updated on

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली शहरातील काही जणांच्या व्हॉट्‌सॲपवर २५ लाखांच्या लॉटरीचे ऑडिओ मेसेज येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे; मात्र हे मेसेज बनावट असल्याचे समोर आले असून कोणीही अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन दापोली पोलिसांकडून केले आहे.

आपल्या व्हॉट्‌सॲप नंबरला २५ लाखांची लॉटरी लागली आहे. आपले केबीसी या संस्थेकडून अभिनंदन. सोबत पाठवलेल्या पत्रावरील नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि ऑनलाइन फोन करा, असे सांगणारा ऑडिओ व सोबत एक महितीपत्र पाठवले जात आहे. या माहितीपत्रकात स्टेट बॅंकेचा लोगो असून सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांचा फोटोही आहे. यासोबत लॉटरी नंबरही दिला आहे.

शासनाची मुद्रा असलेले शिक्केदेखील दर्शविले आहेत. याबाबत स्टेट बॅंकेत चौकशी केली असता, अशा लॉटरीसंदर्भात माहिती नसून हे मेसेज खोटे असल्याचे सांगितले. या ऑडिओसह पाठवलेल्या पत्रकात राणा प्रताप सिंग असे नाव व मोबाईल नंबर दिला आहे; मात्र या नंबरवर फक्‍त व्हॉट्‌सॲपने कॉल करा, असे सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील लोक या लॉटरीसंदर्भात चौकशी करत आहेत.

मात्र हे मेसेज फेक असल्यामुळे व्हॉट्‌सॲप वापरकर्त्यांनी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय असे कोणतेही कॉल करू नयेत. यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. दापोलीसह जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. कोणालाही कोणत्याही प्रकारची खासगी तसेच बॅंक खात्याची माहिती देऊ नये, असे आवाहन दापोली पोलिसांनी केले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marleshwar Waterfall heavy rainfall update
Amba Ghat road widening latest update
Why was the Adali MIDC golf course project cancelled?
Ratnagiri ST bus accident
Marathi News Esakal
www.esakal.com