बागायतदारांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा जामिन अर्ज पुन्हा फेटाळला

fraudulent womans bail application was again rejected
fraudulent womans bail application was again rejected
Updated on: 

ओरोस - काजू बी खरेदी करून तब्बल 23 लाख 21 हजार 768 रुपये एवढी रक्कम न देता विश्‍वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भोसरी पुणे येथील दिव्या रूसिल ओबेरॉय यांचा जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश दोन व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी.रोटे यांनी दुसऱ्यांदा फेटाळून लावला. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील रूपेश देसाई यांनी काम पाहिले.

दिव्या रुसील ओबेरॉय (वय, 47 मूळ रा. भोसरी पुणे) आणि मल्लिकार्जुन हरी गावडे (वय 26, रा. होंडा सत्तरी गोवा) या दोघांनी मिळून झरेबांबर (ता.दोडामार्ग) येथे भाड्याने घर घेऊन संगणमत करून 6 एप्रिल 2019 ते 24 जुलै 2019 या कालावधीत फिर्यादी लक्ष्मण पांडुरंग बोरकर (वय 50, रा. झरेबांबर) तसेच अन्य यांच्याकडून काजू बी खरेदी केले. या सर्वांचे मिळून तब्बल 23 लाख 21 हजार 767 रुपये एवढी रक्कम न देता विश्‍वासघात करून फसवणूक केली व या रकमेचा अपहार केला असल्याबाबतची तक्रार दोडामार्ग पोलिस स्थानकात 24 जुलै 2019 ला दाखल झाली होती.

दोडामार्ग पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून दिव्या ओबेरॉय यांना 22 सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना 1 ऑक्‍टोबरला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सध्या त्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्याला जामीन मिळावा, यासाठी त्यांनी येथील जिल्हा न्यायाधीश दोन व अतिरिक्त सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. हा विनंती अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी एकदा त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Road Accident
Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
Marathi News Esakal
www.esakal.com