Pali News : पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड! इतिहास शिक्षकाचा चार हजार किलोमीटरचा यशस्वी दुचाकी प्रवास

केवळ पर्यटन किंवा साहस म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती आणि अध्यात्म प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगता यावे या उदात्त उद्देशाने पाली येथील इतिहास शिक्षक चंद्रशेखर राऊत यांनी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.
Chandrashekhar Raut

Chandrashekhar Raut

sakal

Updated on

पाली - केवळ पर्यटन किंवा साहस म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती आणि अध्यात्म प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगता यावे या उदात्त उद्देशाने पाली येथील इतिहास शिक्षक चंद्रशेखर राऊत यांनी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी तब्बल ४,००० किलोमीटरचा खडतर आणि तितकाच रोमांचकारी मोटरसायकल प्रवास करत देवभूमी उत्तराखंड गाठले. सहा राज्यांतून केलेला हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला असून या प्रवासातून त्यांनी निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि माणुसकीचे विविध रंग जवळून अनुभवले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com