esakal | सिंधुदुर्गात गणरायाची धुमधडाक्‍यात प्रतिष्ठापना 
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात गणरायाची धुमधडाक्‍यात प्रतिष्ठापना 

सावंतवाडी - जिल्ह्यात गणेशोत्सवाला आजपासून धुमधडाक्‍यात व भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. घरोघरी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना करून जिल्हावासीय लाडक्‍या बाप्पाच्या सेवेत रममाण झाले आहे. सर्वत्र नवचैतन्य पसरले असून गणराया समोरील भजनाने रात्री जागू लागल्या आहेत. 

सिंधुदुर्गात गणरायाची धुमधडाक्‍यात प्रतिष्ठापना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - जिल्ह्यात गणेशोत्सवाला आजपासून धुमधडाक्‍यात व भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. घरोघरी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना करून जिल्हावासीय लाडक्‍या बाप्पाच्या सेवेत रममाण झाले आहे. सर्वत्र नवचैतन्य पसरले असून गणराया समोरील भजनाने रात्री जागू लागल्या आहेत. 

कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. हा सण म्हणजे जणू आनंदाचाच सोहळाचा असतो. याला आजपासून सुरवात झाली आहे. यानिमित्ताने घराघरांत दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा व एकवीस दिवसाचे गणराय विराजमान झाले असून सर्वजण दुःख चिंता बाजूला सारून गणेशाच्या भक्तिसाठी सज्ज झाले आहेत. 

उत्सवाच्या निमित्ताने चारकरमानी गावागावांत दाखल झाले असून घरातील सदस्य या निमित्ताने एकत्र आले आहेत. एकूणच आनंदी वातावरणात लाडक्‍या गणरायाच्या पूजनासाठी सकाळपासूनच लगबग दिसून येत होती. जिल्ह्यात प्रत्येक गावागावांत तेथील रुढी परंपरेनुसार गणरायाचे पूजन केले जाते. आजही काही ठिकाणी पुरोहितांकडून पूजा-पाठ करून विधिवत पूजन करण्याची प्रथा जोपासली जात आहे तर काही ठिकाणी पुरोहिताअभावी घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून हे पूजन होते. गौरी गणपतीचा उत्सवही महिलांकडून पहिल्या दिवशी उत्साहात साजरा करण्यात आला तर काही ठिकाणी हाच उत्सव पाचव्या दिवशी साजरा केला जातो. जिल्ह्यात गणपती पूजनानंतर हा कार्यक्रम या वर्षीही उत्साहात साजरा करण्यात आला. 

आज सकाळीच पावसानेही हजेरी लावत गणरायाचे एकप्रकारे स्वागत केले; मात्र हा पाऊस नंतर लांबत गेल्याने गणरायाच्या मूर्ती गणेश शाळेतून घरोघरी नेण्यात अडचणी निर्माण झाल्या. पावसाची रिपरीप दुपारपर्यंत सुरू असल्याने उत्साहावर काहीसे विरजण पडले. सायंकाळी काहीशी पावसाने उघडीप घेतली. 
मोठ्या शहराप्रमाणे जिल्ह्यातही तालुका पातळीवर प्रतिष्ठापना करण्यात येणारे सार्वजनिक मंडळाचे गणराय फटाक्‍याच्या आतबाजीत व ढोल तलावाच्या गजरात मंडपात विराजमान झाले. 

loading image
go to top