चाकरमान्यांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी कुणी लिहिली रेल्वे मंत्र्यांना पत्र

राजेश कळंबटे
Thursday, 23 July 2020

गणेशोत्सव आणि कोकणचे अतूट नाते आहे.

रत्नागिरी : अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्धोक व्हावा झाली पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक त्या सावधगिरीच्या सर्व उपाय योजना राबविल्या पाहिजेत. चारकमान्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. 

नीलेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, की गणेशोत्सव आणि कोकण अतूट नाते आहे. मुंबईसह कुठेही असलेला कोकणी माणूस या उत्सवासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील त्याच्या गावी हमखास येतोच. मात्र, या वेळी कोरोनामुळे गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या कोरोनामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकणी माणसांसाठी कोकण रेल्वे हा एक विश्वासार्ह आणि उत्तम पर्याय राहिला आहे. त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये कोकणी माणसाला त्याच्या गावी सुखरूप जाण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांसह व्यवस्था करून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. 

दरम्यान, यापूर्वीच राज्य शासनाने चाकरमान्यांना एसटीने कोकणात जाता येईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार राज्य शासन नियोजन केले आहे. लाॅकडउन दरम्यान मोठ्या प्रमाणात मजुर आणि परप्रांतिय कामगारांची वाहतूक करणारी रेल्वे चाकरमान्यांसाठी काय योजना राबवते काही नाही याकडे चाकरमानीही लक्ष ठेवून आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For ganesh festival who write letter to rail minister