शिवसेना आमदाराच्या एकाधिकारशाहीला कंटाळून लांज्यातील 'या" सदस्याचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

लांजा - आमदार राजन साळवी आणि तालुकाप्रमुख संदीप दळवी यांचा कारभार आणि कार्यप्रणाली एकाधिकारशाहीची असल्याचा आरोप करत या पद्धतीला कंटाळून गणेश लाखण यांनी शिवसेना सदस्यपदाचा राजीनामा दिला. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याची माहिती त्यांनी दिली.

लांजा - आमदार राजन साळवी आणि तालुकाप्रमुख संदीप दळवी यांचा कारभार आणि कार्यप्रणाली एकाधिकारशाहीची असल्याचा आरोप करत या पद्धतीला कंटाळून गणेश लाखण यांनी शिवसेना सदस्यपदाचा राजीनामा दिला. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केल्याची माहिती त्यांनी दिली.

लाखण रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. दरम्यान,लाखण यांच्या राजीनाम्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. 

राजीनामा नाट्यासंदर्भात बोलताना गणेश लाखण म्हणाले , राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेऊन आपणच हे केले, असे वरिष्ठांना दाखविण्यात आमदार राजन साळवी पुढे राहिले. यासाठी प्रत्यक्ष काम नसेल तरी चालेल पण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणताही कार्यक्रम, मेळावे यापासून आम्हाला दूर ठेवून वरिष्ठांना खूश करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान या विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष बांधणी प्रामाणिक शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी केलेली असताना या संघटनेवर आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी एकाधिकारशाही आणून सर्व सामान्य आणि निष्ठावान शिवसैनिकांची गळचेपी केली आहे. अखेर आमदार राजन साळवी यांच्या या कार्यप्रणालीला कंटाळून आपण राजीनामा दिला आहे.दरम्यान, गणेशोत्सव संपल्यानंतर या मतदार संघातील अन्य शिवसैनिक, पदाधिकारी राजीनामास्त्र उगारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Lakhan resign Shivsena membership