esakal | सिंधुदुर्गात वाजंत्रीशिवाय गणरायाची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh murti formed start in sindhudurg with regulations of government cause corona

चौसोपी वाड्यातील ३७५ वर्षांची परंपरेच्या गणपतीची मिरवणुकीशिवाय सिद्धीविनायक मंदिरात प्रतिष्ठापना

सिंधुदुर्गात वाजंत्रीशिवाय गणरायाची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : देवरुख वरची आळीतील पंत जोशी यांच्या चौसोपी वाड्यातील ३७५ वर्षांची परंपरेच्या गणपतीची मिरवणुकीशिवाय सिद्धीविनायक मंदिरात प्रतिष्ठापना झाली आहे. कोरोनामुळे वाजंत्री आणि माणसांच्या गर्दीशिवाय गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. चौसोपी वाड्यातील या गणेशोत्सवाला पेशवेकालीन परंपरा असल्याचे सांगितले जाते. गेली ३७५ वर्ष जोशी कुटुंबीय आणि स्थानिक रहिवासी गणेशोत्सव मोरगावच्या प्रथेप्रमाणे साजरा करतात. 

हेही वाचा - निसर्गशाळेत ऑनलाईनचे धडे; कोकणातल्या युवतीची शिक्षणासाठी धडपड...

यंदा कोरोनामुळे शासनाच्या नियमांचे पालन करुन या उत्सवाला सुरुवात झाली आहे. शासन नियमानुसार ठराविक लोकांनाच गणेशमूर्ती आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोळजाई देवी आणि मानकरी यांना निंमत्रण देवून शिवाजी चौक येथील नरेंद्र भोंदे यांच्या गणेशचित्रशाळेतून अश्वारुढ गणरायाच्या मूर्तीसह रिद्धि-सिद्धी व भालदार चोपदार असा सारा संस्थानिक लवाजमा  मोरयाच्या गजरात वाहनातून मंदिरात दाखल झाला. 

दत्ता साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जोशी यांनी या गणरायाचे पुजन केले. धार्मिक विधींसह गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोशल डिस्टस्टिंग पाळत आरती करण्यात आली. उत्सवकाळात कोरोनाच्या नियमांचे पालन करत मंदिर परिसरात सॅनिटायझरसह सुचनांचे फलक लावण्यात आले आहेत.

हेही वाचा -  लाॅकडाउनची झळ गणेशोत्सवाला, मूर्तीकारांनी काय व्यक्त केली खंत? वाचा...

चौसोपी वाड्यातील या गणरायांच्या आगमनाने संगेश्वर तालुक्यातील गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनामुळे यंदा वरची आळी नागरीकांना गणरायांच्या आगमन मिरवणुकीत सहभागी होता आले नसल्याची खंत व्यक्त केली. चतुर्थीला सर्व घरगुती व सार्वजनिक मंडळांचे गणरायांचे आगमन होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top