esakal | Good News: गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी RTPCR चे बंधन नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Lord-Ganesh.jpg

Good News: गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी RTPCR चे बंधन नाही

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : दोन डोस व आरटीपीसीआर झाली नसेल त्यांना कोरोना चाचणीसाठी सक्‍ती करु नये. ज्या चाकरमान्यांना लक्षणे जाणवत असतील त्यांनी स्वत:हून काळजी घ्यावी. ग्रामकृतीदलाला याची माहिती द्यावी. स्वत:च्या कुटुंबियांची व ग्रामस्थांची काळजी घ्यावी. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. चाकरमान्यांनी स्वत:हून ग्रामस्थांसह कुटुंबीय सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामकृती दलांना याबाबत तपासणीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ किंवा वाद होण्याची शक्यता होती. अगदी रेल्वेस्थानकावरही काही ठिकाणी आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या जात होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये येणार्‍या चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नाही.

मुळात अठरा वर्षापर्यतच्या मुलांना अद्याप कोरोनाचे लसीकरण सुरु नाही. अनेकांचे दोन डोस तर काहींचा एकच डोस झालाय. आरटीपीसीआर टेस्टमुळे झालेला गोंधळ दूर करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती मंजूलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. ग्रामकृतीदलांनी दोन डोस व आरटीपीसीआर झाली नसेल त्यांना टेस्टसाठी सक्‍ती करु नये असा निर्णय घेण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी उपस्थित होते.

loading image
go to top