पर्यटकांसाठी खुशखबर ; गणपतीपुळे बीच अनलाॅक

पर्यटकांसाठी खुशखबर ; गणपतीपुळे बीच अनलाॅक
Updated on: 

रत्नागिरी : जीवरक्षक नसल्यामुळे गणपतीपुळे किनार्‍यावर पर्यटकांना स्थानिक पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता; मात्र मंगळवारी (ता. 17) हा किनारा ग्रामपंचायतीकडून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. किनार्‍यावर जाण्यास कोणीच अडकाठी न केल्यामुळे पर्यटकांचा राबताही होता. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकही ग्रामपंचायत नेमणार आहे.

सलग सुट्ट्या आणि कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांचा राबता दोन दिवस वाढलेला होता. अनेक पर्यटक बिनधोकपणे समुद्रस्नानाला उतरत होते. किनार्‍यावर जीवरक्षक नसल्यामुळे स्थानिक पोलिसांकडून त्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीला सुरक्षेविषयक उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तोपर्यंत गणपतीपुळे देवस्थानचे दोन रक्षक तिथे नियुक्त केले गेले आणि किनार्‍यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. या निर्णयावरुन पर्यटकच नव्हे तर स्थनिक व्यापारीही नाराज होते.

पर्यटकांसाठी खुशखबर ; गणपतीपुळे बीच अनलाॅक
मराठा समाजाचे 'मसिहा' म्हणून मिरविणारे राणे कुठे दडून बसले?

गणपतीपुळेमधील निर्णयाचे ‘सकाळ’ने प्रसिध्द केले; मात्र मंगळवारी बिच पर्यटकांसाठी मोकळा करुन देण्यात आला होता. किनार्‍यावर जाण्यासाठी पर्यटकांना कोणीच मज्जाव केला नाही. स्थानिक पोलिसांनीही जीवरक्षकाचा मुद्दा असल्यामुळे अडकाठी केल्याचे स्पष्ट केले आहे. देवस्थान परिसरात लावण्यात आलेली दोरी आणि फलक दोन्ही काढून टाकण्यात आले होते. मंगळवारीही अनेक पर्यटक किनार्‍यावर फिरत होते. काहींनी समुद्र स्नानाचाही आनंद घेतला होता. ती दोरी आणि फलक पर्यटकांकडूनच काढून टाकण्यात आले होते. कोणीच मनाई न केल्यामुळे पर्यटकही किनार्‍यावर फिरत होते. किनारा खुला झाल्यामुळे फेरीवाल्यांना दिलासा मिळाला.

मंगळवारी पर्यटकांची गर्दी नव्हती, थोडेफार पर्यटक फिरत होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक नियुक्तीचाही निर्णय घेण्यात आला आहे.

- महेश केदारी, उपसरपंच, गणपतीपुळे

ग्रामपंचायतीने पर्यटकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी शासनाच्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत बीच फिरण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच जीवरक्षकांना हजर होण्यासाठी पत्रही दिले आहे. ‘सकाळ’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेऊन गणपतीपुळे ग्रामपंचायतीने तत्काळ कार्यवाही केली आहे.

- गजानन पाटील, सदस्य, पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com