रत्नागिरीत घनकचऱ्याचा लवकरच ‘रिवाईज प्लॅन’ ; पालिकेचा निर्णय

garbage waste revised plan coming soon in ratnagiri decisions taken by corporation
garbage waste revised plan coming soon in ratnagiri decisions taken by corporation

रत्नागिरी : शहराच्या विस्तारीकरणाचा भविष्यातील ३० वर्षांचा विचार करून उभारल्या जाणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा रिवाईज प्लॅन (फेर आराखडा) करावा लागणार आहे; मात्र एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने पालिकेने फेर आराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला. पहिला आराखडा सुमारे १५ कोटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाचा होता. 

शहराजवळील दांडेआडोम येथे सुमारे १५ कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. सुमारे अडीच हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प असून कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रदूषणही नाही किंवा काही वायाही जाणार नाही, असा दावा यापूर्वी पालिकेने केला आहे. त्याचा डीपीआर (डीटेल्ड प्रोजेक्‍ट रिपोर्ट) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

सध्या कंपाउंड आणि अंतर्गत रस्त्यांचा १ कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, त्यामध्ये काही बदल केले आहेत. मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प उभारणार आहे. एकाच ठिकाणी सर्वकाही करण्याचा पालिकेचा विचार आहे. शहरापासून काही कि.मी. लांब असल्याने त्याचा विचार करून फेरआराखडा तयार केला जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानात केंद्राचे बक्षीस मिळविणाऱ्या पालिकांपैकी रत्नागिरी पालिका ही एक आहे; मात्र पालिकेचा घनकचरा प्रकल्प नव्हता. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियाना पूर्वीपासून पालिका घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील होती. शहराजवळपासच्या अनेक जागा निश्‍चित केल्या; मात्र त्याला विरोध झाला. 

दांडेआडोम ग्रामस्थांचा विरोध, पालिकेच्याबाजूने निकाल
घनकचरा प्रकल्पासाठी अखेर दांडेआडोम येथील जागा निश्‍चित केली. पालिकेने तेथे घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला; मात्र दांडेआडोम येथील ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. ते पालिकेविरोधात न्यायालयात गेले. अनेक वर्षे ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पालिकेच्याबाजूने निकाल दिला. त्यामुळे घनकचरा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

एक नजर

  • शहरात सुमारे २२ टन कचरा दरदिवशी होतो गोळा 
  • कचऱ्यावर या घनकचरा प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार
  • १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे पालिकेचे नियोजन 
  • आधुनिकतेची जोड देत तयार होणार फेर आराखडा 

दुर्गंधी व प्रदूषण न होण्याचा दावा

कचरा डम्प करून (गोळा करून) ठेवला न जाता त्यावर थेट प्रक्रिया केली जाणार आहे. प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून ते सिमेंट कंपनीला दिले जाणार आहे. वैद्यकीय कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही, असा पालिकेचा दावा आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com