प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस जोडणी वाटप

लक्ष्मण डूबे 
शनिवार, 14 जुलै 2018

रसायनी (रायगड) : हेल्पेज इंडिया, मोबाइल हेल्थकेयर युनिट पाताळगंगा व भारत गॅस वितरण केंद्र रसायनी यांच्या वतीने वासांबे मोहोपाडा येथील एचओसी काॅलनीतील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात आज (ता. 13) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस जोडणी देण्यात आल्या आहे. 

यावेळी हेल्पेज इंडियाचे संचालक  प्रकाश बोरगावकर, प्रदीप कदम, उल्का धुरी, प्राची साबळे श्री साईबाबा सत्संग केंद्राचे अध्यक्ष एम एस मगर, उपाध्यक्ष गवळी भारत गॅसच्या स्वाती यादव आदि उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते वडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दितील वाशिवली कातकरवाडी, वाशिवली डोंगरवाडी येथील 43 लाभार्थींना गँस जोडणीचे वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रकाश बोरगावकर व उल्का धुरी यांनी लाभार्थी महिलांना गॅस वापराचे फायदे व महत्व  या विषय माहिती दिली. तर भारत गॅसच्या स्वाती यादव व उल्का धुरी यांनी गॅस वापरा बदल माहिती देऊन प्रात्यक्षीक करून दाखवले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले. तर गॅस जोडणी मिळुन देण्यासाठी हेल्पेज इंडिया या संस्थेने सहकार्य केल्याने लाभार्थींनी समाधान व्यक्त केले.  

मोहोपाडा, चांभार्ली, वडगाव, आसरे, टेंभरी,  लोधिवली, वावर्ले, माडप, चावणी, जांभिवली, आपटे, चावणे, आदि ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंत्योदय शिधा पत्रिका धारक आणि अनुसूचित जमाती लाभार्थींना 20 एप्रिल 18 पासुन एक हजार पाचशे सहा लाभार्थीं महिलांना शंभर रूपायात  प्रधानमंत्री एल पी जी पंचायत  योजनेतुन गॅस जोडणी देण्यात आल्या आहे. असे केंद्राचे शिवदास जगताप यांनी सांगितले आहे.  

Web Title: gas connection distributed to pradhanmantri ujjwala yojana