विहिरीत पडला गवा अन्....

Gava Fall In Well Ratnagiri Marathi News
Gava Fall In Well Ratnagiri Marathi News

रत्नागिरी - तालुक्‍यातील भोके येथे विहिरीत पडलेल्या गव्याला (रेडा) सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. गव्याला विहिरीतून बाहेर काढणे सोपे नव्हते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून एक शक्कल लढविली. त्यासाठी स्थानिकांची मदत घेतली. जेसीबीने खोदून विहिरीच्या एका बाजूने मोठी चर पाडली. भयभीत झालेला गवा त्या चरीतून सुखरूप बाहेर पडला. सुमारे अडीच ते तीन तास सुटकेसाठीचे हे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 

तालुक्‍यातील भोके येथील ब्राह्मणवाडीतील सुभाष जयराम कुलकर्णी यांच्या घरासमोरील विहिरीत गवा रेडा पडला होता. विहीर सुमारे वीस फूट खोल होती. सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली. गवा विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. रेड्याला पाहण्यासाठी ही गर्दी झाली. दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या गवा रेड्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. गवा रेड्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. अखरे वनविभागाने शक्कल लढविली.

गव्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर काही तरी विपरित घडण्याची शक्‍यता होती. तसेच गव्याच्या जिवालाही धोका होता. म्हणून विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या साहाय्याने खोदून त्याला मार्ग करण्याचा निर्णय झाला. जेसीबीने विहिरीच्या एका बाजूला खोदून मोठी चर निर्माण केली. चरीची माती विहिरीत पाडली. त्यामुळे गव्याला विहिरीबाहेर येणे सोपे झाले. खोदलेल्या मार्गाने गवा सर्व बळ एकवटून त्या चरीतून चढून सुखरूप बाहेर पडला. रेड्याला बाहेर पडण्याचा रस्ता बनवून देण्यात आला. मार्ग बनवताच गवा रेडा विहिरीतून बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने पळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com