घोलवड वासियांना बसला मुसळाधार पावसाचा फटका

अच्युत पाटील 
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- घोलवड वासियांना शुक्रवारी सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.
- घोलवड ग्रामपंचायत कार्यालय भाजी मार्केट मराठवाडा परिसर तसेच झेंडा चौक सुविधा वसतिगृह परिसरात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
- घोलवड गावातील पाण्याचा निचरा होणारी नाले गटारी अतिक्रमणखाली दबली गेली आहेत. 

बोर्डी : घोलवड वासियांना शुक्रवारी सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. घोलवड ग्रामपंचायत कार्यालय भाजी मार्केट मराठवाडा परिसर तसेच झेंडा चौक सुविधा वसतिगृह परिसरात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घोलवड गावातील पाण्याचा निचरा होणारी नाले गटारी अतिक्रमणखाली दबली गेली आहेत. 

अनेक लोकांनी इमारतींखाली पाण्याचा निचरा करणाऱ्या गटारी दाबले आहेत. याचा परिणाम मागच्या वीस वर्षापासून ग्रामस्थ भोगत आहेत. याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी सातत्याने महसूल विभागाकडे तक्रार करण्यात येत आहे मात्र, दखल घेतली जात नसल्याने गावात नाराजी पसरली आहे. शुक्रवार (ता. 2) शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्याआदेश बांदेकर यांच्या माऊली संवाद या कार्यक्रमातही या याचे पडसाद उमटले होते.

 घोलवड गावात मूलभूत सुविधाचा अभाव असल्याची तक्रार अनेक महिलांनी केल्याने आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल देण्याची ग्वाही दिली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या प्रकाराने महिलांच्या तक्रारीला दुजोरा मिळत असून आता घुलेवाडी ग्रामपंचायत काय पाऊल उचलते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gholvad residents facing problem due to heavy rains