अर्ध्यावरतीच डाव मोडला! नवविवाहितेचा अपघाती मृत्यू

goa accident one woman died bhogve village konkan sindhudurg
goa accident one woman died bhogve village konkan sindhudurg
Updated on: 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - भोगवे कोलवेळवाडी (ता. वेंगुर्ले) येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (वय 23) हिचा वास्को गोवा येथील अपघातात मृत्यू झाला. दहा महिन्यांपुर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्याचा भातुकलीच्या खेळाप्रमाणे अर्ध्यावरच डाव मोडल्याने भोगवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी तालुक्‍यातील गोवरी भगतवाडी येथील संचिता पाटकर यांच्याशी विवाह झाला होता. गोवा येथे दोघे कामाला होते. गुरुवारी (ता.24) संचिता आपल्या पतीसोबत दुचाकीवरून कामावर जात होती. वास्को न्यू वाडा येथे दुचाकीचा टायर पंक्‍चर होऊन संचिता मागच्या मागे रस्त्यावर कोसळली.

या अपघातात संचिता डिव्हायडरवर आपटली. यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. सचिनने स्थानिकांच्या मदतीने तिला तत्काळ गोमेकॉत उपचारासाठी हलविले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल (ता.25) तिच्यावर भोगवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मागे पती, सासू, दीर, भावजय, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com