नियम धाब्यावर बसवुन निकृष्ठ दर्जाच्या आहाराचे वितरण करणाऱ्या गोदामला लागले सील

godown seal in ratnagiri provide cheap grain to pregnant women and child in ratnagiri
godown seal in ratnagiri provide cheap grain to pregnant women and child in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यातील अंगणवाड्यातील मुले, गरोदर आणि स्तनदा माता याना अत्यंत निकृष्ठ दर्जाचे, टोके, किडी लागलेले धान्य चांगल्या पॅकिंगमधून अन्न व औषध प्रशासनाचे अनेक नियम डावलून रत्नागिरीतून वितरित करणाऱ्या रत्नागिरी एमआयडीसीतील गोडावूनला अखेरीस बुधवारी मध्यरात्रीनंतर अन्न व औषध प्रशासनाने टाळे लावून सील केले. 

मिरजोळे एमआयडीसीमधील एका गोदामात अंगणवाडीतील बालक व गरोदर मातांना देण्यात येणारे धान्य महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या नावाखाली पॅकिंग होत असून यातील अनेक पाकीटांवर तारीख, पॅकिंग नंबर टाकला जात नसल्याची माहिती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व उपाध्यक्ष नंदू चव्हाण यांना मिळाली. माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पदाधिकार्‍यांसह राजू कीर, नित्यानंद दळवी, हर्षद घोसाळकर, विकी जैन, संकेत बापट, संजय आयरे या माहितीनंतर त्यांनी काही कार्यकर्त्यांसह गोदामावर धडक दिली. 

यावेळी गव्हाची फुटलेली पोती, गव्हात दगडांसह कच, कचरा मोठ्या प्रमाणात असल्याचे पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. गव्हाप्रमाणेच हरभरेही लागलेले, त्यात पडलेले टोके, मसुरडाळीचीही तीच अवस्था असल्याचे दिसून आले. यानंतर भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांनी तातडीनी अधिकार्‍यांशी संपर्क साधत याची माहिती दिली. पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस कर्मचारी तातडीने गोदामात दाखल होत त्यांनी परिस्थिती जाणून घेतली.

हा प्रकार भाजयुमोच्या धसास लावल्यामुळे अखेरीस रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झालेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गोडावून ताब्यात घेऊन आपल्या कारवाईस सुरुवात केली होती. गहू, डाळ आणि हरभऱ्याचे नमुने घेत, पंचनामा करून मध्यरात्री हे गोडाऊन सील करण्यात आले. या वेळी माजी खासदार निलेश राणे हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते तर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, नंदू चव्हाण घटनास्थळी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com