आता नाटे, रसाळगड, गोवा किल्ल्याला नवा साज; शासनाकडून 23 कोटींचा निधी मंजूर, पुरातत्त्‍व विभागाची माहिती

Government News : इतिहासाच्या पाऊलखुणा म्हणून जिल्ह्यातील गड, किल्ल्यांची ओळख आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष असलेल्या या किल्ल्यांना पर्यटनदृष्ट्या फारच महत्त्व आहे.
Archaeological Department
Archaeological Departmentesakal
Updated on
Summary

पावसाबरोबरच समुद्राच्या लाटांचे तडाखेही सहन करावे लागतात. कोकणातील वास्तव्यावेळी काही किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) हजेरी लावल्याच्या नोंदीही आहेत.

रत्नागिरी : राज्याच्या पुरातत्त्व खात्याने (Archaeological Department) केंद्र आणि राज्य संरक्षित किल्ल्यांचे जतन व संवर्धन आणि किल्ल्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पावले उचललेली असून टप्प्याटप्प्याने निधीही दिलेला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा (हर्णै), नाटे, रसाळगड या तीन किल्ल्यांची कामे सुरू असून, त्यासाठी सुमारे २३ कोटी रुपये मंजूर आहेत पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली ही कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील दीड वर्षात ही कामे पूर्ण होतील, असे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com