
किन्हवली : सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून अधिकृत शिधापत्रिकाधारकांना तांदूळ, गहू असे धान्य वितरीत केले जाते. शिधापत्रिकेत ऑनलाइन नोंद असलेल्या सर्व कार्डधारकांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून ई. के वाय सी. करणे क्रमप्राप्त असून सर्व ग्राहकांनी आपली ई के.वाय.सी करून घेणे बंधनकारक आहे, सर्वांनी या बाबत सहकार्य करावे असे शहापूरचे तहसीलदार व पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी आवाहन केले आहे.