संचमान्यतेचे निकष बदलून सरकारी शाळांमधील (Government School) सहावी ते आठवीच्या वर्गासाठी २० पटसंख्येच्या आतील वर्गांना अखेर एक पदवीधर शिक्षक मंजूर करण्यासाठी शासनाने होकार दिला आहे.
रत्नागिरी : राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक तसेच खासगी आस्थापनातील शाळेतील शिक्षकांना दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे. आता वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक पदवीधर शिक्षक देण्याचे शासनाने मान्य केले आहे. मात्र, त्या शाळेवर दोन शिक्षक द्यावेत, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून (Teachers Union) करण्यात येत आहे.