ग्रामपंचायत निवडणुकीचे डावपेच गोत्यात 

gram panchayat election 2020
gram panchayat election 2020

चिपळूण - तालुक्‍यात 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे; मात्र निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचे डावपेच गोत्यात आले आहेत. कायद्यातील नव्या तरतुदीनुसार सरपंचपदासाठी 1995 नंतर जन्माला आलेल्या उमेदवाराचे शिक्षण 7 वी उत्तीर्ण आवश्‍यक असल्याने गावागावात डावपेचांचा लोच्या झाला आहे. 

आयत्या वेळी अनेक उमेदवारांना जात पडताळणीचा प्रस्ताव जिल्ह्याकडे सादर करण्यासाठी एकच तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे. आरक्षण पडल्यावर आपल्याकडे अटीशर्ती पूर्ण करणारा उमेदवार असावा. त्याला निवडून आणणे आवश्‍यक असल्याने पॅनेल प्रमुखांना आव्हान ठरणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीबाबत 19 जुलै 2017 रोजी अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली तर 5 मार्च 2020 च्या अधिसूचनेत कलम 13 चा पोटकलम 2 अ मध्ये सरपंच शब्दाऐवजी सदस्य शब्द समाविष्ट करण्याबाबत सुधारणा झाली. एवढाच बदल झाला असून अन्य अटी 19 जुलै 2017 रोजी अधिसूचनेच्या सुधारणेतील कायम राहिल्या आहेत. आता सदस्यांमधून सरपंच निवड होणार असून निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षण न करता ते निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय झाला. परिणामी ग्रामपंचायतीत सरपंच होण्याचे मनसुबे बाळगणाऱ्यांची धास्ती वाढली आहे. पॅनेल प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. कायद्यातील तरतुदीत सुधारणा केली असली तरी सरपंच पदासाठीचा उमेदवार हा 1995 नंतर जन्मलेला असेल तर तो 7 वी पास आवश्‍यक आहे. हीच अट निवडणुकीत कायम असल्याने ती अडचणीची ठरणार आहे. 
 
उमेदवारी अर्ज भरताना आवश्‍यक अटी 
1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या उमेदवाराचे शिक्षण 7 वी उत्तीर्ण असणे आवश्‍यक. निवडणुकीसाठी नवीन बॅंक खाते उघडून पासबुक झेरॉक्‍स (राष्ट्रीयकृत बॅंक) अनामत रक्कम भरल्याची पावती, वय 21 वर्षे पूर्ण असल्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र सहा महिन्यात दाखल करण्याचे हमीपत्र (राखीव उमेदवारांसाठी), गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत पोलिसांचे प्रमाणपत्र, मालमत्ता घोषणापत्र, 12 सप्टेंबर 2001 नंतर अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय वापरात असल्याचे प्रमाणपत्र, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र. 
 
नव्याने करावी लागणारी व्यूहरचना.. 
आरक्षण कसे असेल, हे निश्‍चित नसल्याने 1995 नंतर जन्मलेला प्रत्येक उमेदवार 7 वी पास शोधून त्याचा अर्ज भरावा लागणार आहे. कदाचित आरक्षण जाहीर झाले की तसा सरपंच पदासाठी पात्र उमेदवार आपल्याकडे असावा, म्हणून ही अट पूर्ण करणारा उमेदवार आपल्याकडे असलाच पाहिजे. यासाठी उमेदवार देताना नव्याने करावी लागणारी व्यूहरचना दमछाक करू लागली आहे .  

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com