Raigad News : खांबेरेतील पराभव शिंदे गटाच्या जिव्हारी; राष्‍ट्रवादीने विश्‍वासघात केल्‍याचा तालुका प्रमुखाचा आरोप

उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्‍ट्रवादीने विश्‍वासघात केल्‍याचा तालुका प्रमुखाचा आरोप
Gram Panchayat Election 2023
Gram Panchayat Election 2023esakal
Updated on

रोहा : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाने घवघवीत यश संपादन केले. चणेरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार निवडून आल्यानंतर उपसरपंचपदासाठी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीला मदत केली.

सानेगावमध्ये स्थानिक आघाडीच्या माध्यमातून सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार विराजमान होताच उपसरपंचपद ठरल्याप्रमाणे मित्र पक्षाला बहाल केले. मात्र खांबेरे ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचा विश्वासघात केला. त्‍यामुळे चणेरा भागातून राष्ट्रवादी पक्ष हद्दपार करण्याचा संकल्प सोडत असल्‍याची घोषणा शिंदे गटाचे तालुका प्रमुख अॅड. मनोजकुमार शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गटातील संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. चणेरा भागातील खांबेरे ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विश्‍वासघात केल्‍याने झालेला पराभव शिंदे गटाच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात नुकतीच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहर प्रमुख मंगेश रावकर, उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर उपस्थित होते.

खांबेरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष शेकापची सत्ता होती. शेकापला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने शिंदे गटाशी युती केली. राष्‍ट्रवादीवर विश्‍वास ठेवून शिंदे गटाच्या उमेदवाराने सरपंचपदासाठी दाखल केलेला अर्जही मागे घेतला. युतीचे सरपंच अतिष मोरे यांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला. असे असताना राष्ट्रवादीने उपसरपंचाच्या निवडणुकीत विश्‍वासघात केला. त्‍यामुळे नाराज झालेल्‍या शिंदे गटाचे स्‍थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत राष्‍ट्रवादीला मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षभरात शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवली आहे. १२ ग्रामपंचायतींमध्ये २५ सदस्य निवडून आणले असून दोन ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी पक्षाशी युती करणार नाही. आगामी निवडणुकीत जनता विकासकामांना प्राधान्य देत राष्‍ट्रवादीला धडा शिकवेल.

- ॲड. मनोजकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष, शिंदे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Bori Khurd Villagers Protest by Performing Funeral at Gram Panchayat Office Due to Absence of Cremation Ground
Marathi News Esakal
www.esakal.com