Gram Panchayat Election : दोनवेळा एकच थेट सरपंच

सरपंचपदी म्हसकर; साखरीत्रिशूळ ग्रामपंचायत बिनविरोध
Gram Panchayat Election One direct Sarpanch twice guhaghar ratnagiri politics
Gram Panchayat Election One direct Sarpanch twice guhaghar ratnagiri politicssakal

गुहागर : तालुक्यातील साखरीत्रिशूळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने एक विक्रम केला आहे. थेट जनतेतून सरपंच निवड बिनविरोध करताना येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सचिन म्हसकर यांची निवड केली. त्यामुळे सलग दोनवेळा थेट जनतेतील सरपंच बनवण्याचा विक्रम तालुक्यात प्रथमच सचिन म्हसकर यांनी केला आहे. साखरीत्रिशुळ ग्रामपंचायतीच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हसकर सरपंचपदाचे उमेदवार होते. २०१७ मध्ये प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडून द्यायचा होता. या निवडणुकीत म्हसकर हे बहुमताने विजयी झाले. सर्वात तरुण सरपंच म्हणून म्हसकर यांनी साखरीत्रिशुळ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सुरवात केली.

ग्रामपंचायत कारभाराची कोणताही अनुभव नसताना ज्येष्ठ, अनुभवी ग्रामस्थ, ग्रामसेवक, पंचायत समितीमधील अधिकारी, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे मित्र असलेले पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून गावाच्या विकासकामांना सुरवात केली. त्यांच्या पाच वर्षातील कारभाराने ग्रामस्थ समाधानी होते. त्यामुळेच २०२२ मध्ये होणाऱ्या साखरीत्रिशुळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत म्हसकर यांना गावाने पुन्हा सरपंचपदाची संधी दिली. ही निवडणूकदेखील थेट जनतेतून असल्याने म्हसकर यांच्या नावाला संपूर्ण गावाची सहमती आवश्यक होती. या वेळी साखरीत्रिशुळ गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. माजी पोलिस पाटील आणि नवनियुक्त तंटामुक्त समिती अध्यक्ष महमद अली हारून तुरुक यांनी पुढाकार घेतला.

त्याला सर्व वाड्यांच्या प्रमुखांच्या सहकार्य मिळाले. वाडी, प्रभाग, गाव अशा वेगवेगळ्या स्तरावर बैठका झाल्या. संवादातून सहमतीने सरपंच म्हणून सचिन म्हसकर, प्रभाग क्र. १ मधून सुवर्णा भोसले, सिताराम म्हसकर आणि दर्शना बेटकर, प्रभाग क्र. २ मधून शकील तुरुक आणि मसुदा तुरुक, प्रभाग क्र. ३ मधून राकेश चाफे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून नावे निश्चित झाली. प्रभाग दोनमधील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्रीसाठी आरक्षित आहे. त्या जागेसाठी जातपडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली महिला न मिळाल्याने ही जागा आज रिक्त आहे. सोमवारी (ता. ५) छाननीमध्ये साखरीत्रिशुळ गावातील सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com