भाजपला द्यावी लागणार मोठी झुंज ; राष्ट्रवादीची चूल मात्र वेगळीच ?

gram panchayat election in ratnagiri BJP face problems in ratnagiri
gram panchayat election in ratnagiri BJP face problems in ratnagiri

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावण्यासाठी सरसावले आहेत. रत्नागिरी तालुका सेनेचा बालेकिल्लाच आहे. महाविकास आघाडी ग्रामपातळीवर किती उतरणार, यावर साशंकता असली तरीही भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीही बळकवण्याची संधी सेनेला मिळणार आहे. भाजपमधील अंतर्गत धुसफूस त्यांच्या पथ्थ्यावर पडेल. महाविकास आघाडी असली तरीही राष्ट्रवादी रत्नागिरीत वेगळी चूल मांडण्याची शक्‍यता आहे. ५१ पैकी पाच ग्रा.पं.मध्ये भाजपचा बोलबाला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच तालुक्‍यात शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला होता. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मेळावे घेत, शिवसैनिकांना घराघरांत जाऊन विकासकामांच्या कुंडल्या ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाजपमुक्‍त तालुका करण्याचे आवाहनही त्या वेळी केले होते. महाविकास आघाडीने वर्चस्व असलेल्या पक्षाच्या मतदार संघात ६०-२०-२० असे जागांचे वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार केला आहे.

तालुक्‍यात राष्ट्रवादीचे गड काही ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत; मात्र काँग्रेसची अवस्था तालुक्‍यात बिकट आहे. ५१ पैकी ७ ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा बोलबाला आहे. त्यात कोतवड, राई, चाफे, डोर्ले, गावखडी, चांदेराईसह ओरीचा समावेश आहे. ओरीमध्ये गावपॅनेलचे वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपला वर्चस्व ठेवण्यासाठी मोठी झुंज द्यावी लागणार आहे. 

सामंत यांची पकड मजबूत..

सेनेला धक्‍का देत ग्रामीण भागात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जोरदार प्रयत्न करावे लागतील. सामंत यांची पकड मजबूत असल्यामुळे त्यातून ग्रामपंचायती जिंकण्याचे भाजपपुढे आव्हानच राहणार आहे. 

..याकडे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष ठेवावे लागणार

राज्यातील महाविकास आघाडी गावपातळीवर राबविण्याचा प्रयत्न झालाच तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना सामावून घेताना शिवसैनिकांची समजून काढावी लागणार आहे. यामधून नाराजीचे वातावरण निर्माण होऊ नये, याकडे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना 
लक्ष ठेवावे लागेल.

बाळ मानेंच्या ताकदीचा फायदा घेणार का?

ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्याबाबतचे विद्यमान पदाधिकाऱ्यांचे धोरण तितकेसे सकारात्मक दिसत नसल्याने गट-तट आहेत. माने यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोतवडेत मेळावा घेतला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मानेंच्या लोकसंपर्काचा उपयोग विद्यमानांनी घेतला नाही तर ग्रामपंचायती ताब्यात ठेवणे जड जाऊ शकते, असेच चित्र आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com