तीन महिन्यांत या 500 ग्रामपंचायतीची मुदत संपणार ; अधिकारी की.... जनतेतून संभ्रम? 

Gram Panchayat elections expire postponed in three months in kokan
Gram Panchayat elections expire postponed in three months in kokan

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्यातील पुढील तीन महिन्यांत मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे 500 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रशासक हा अधिकारी असतो. मात्र, सोशल मीडियावर प्रशासकाची निवड जनतेतून करण्याबाबतचा संदेश पसरत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


कोरोनामुळे विविध निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्रामपंचायत निवडणुकांना बसला आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका न घेता तिथे प्रशासक नेमण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्या-त्या तालुक्‍यातील गटविकास अधिकारी यांना प्रशासक नियुक्तीचे अधिकार आहेत.

लवकरच प्रशासक नियुक्‍त​

ग्रामपंचायतींवरील प्रशासक हा राज्यपाल नियुक्‍त असेल, असा संदेश सोशल मीडियावर पसरत आहे. त्यामुळे गावागावांत याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबतचे आदेश अद्याप येथील प्रशासनापर्यंत पोचलेले नाहीत. त्यामुळे सद्यःस्थितीत ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रशासक नियुक्तीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. प्रशासक नेमण्याचे अधिकार हे गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 


पुढील तीन महिन्यांत ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्याठिकाणी प्रशासक नेमण्यात येईल. त्यादृष्टीने जिल्हास्तरावरील निवडणूक विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे. 
- मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com