गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांना ग्रामपंचायतीची नोटीस; 'या' तारखेपासून स्टॉल बंद करण्याचे आदेश, काय आहे कारण?

तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ (Tourism) आहे.
Ganpatipule Beach
Ganpatipule Beachesakal
Summary

गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वॉटर स्पोर्टस्‌ व्यवसाय संबंधित व्यवसायिकांनी शनिवारपासून बंद केले आहेत.

गणपतीपुळे : गणपतीपुळे येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या (Ganapatipule Gram Panchayat) सर्वे नं. २ मध्ये असलेल्या सुमारे ६० स्टॉलधारकांना ग्रामपंचायतीने नोटीस (Gram Panchayat Notice) बजावली आहे. वादळी वातावरण आहे, त्यामुळे उधाणाच्या लाटांमुळे नुकसान होण्याचा धोका आहे. खबरदारी म्हणून ही नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायतीने बजावली आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारी व मोरया चौक, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ (Tourism) आहे. समुद्रकिनारी, मोरया चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुमारे ६० च्या वर स्टॉलधारक आहे. त्यांना आपले व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत ३१ मे पर्यंत आहे. त्यामुळ सर्व स्टॉलधारकांनी आपले स्टॉल ३१ मेपासून बंद करावेत, असे आदेशात म्हटले आहे. ३१ पासून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. त्यानंतर जे हातगाडी व्यावसायिक, स्टॉलधारक स्टॉल चालू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायतीने नोटीशीद्वारे दिला आहे.

Ganpatipule Beach
'या' देवस्थानमध्ये बकऱ्याचा बळी देण्यावर बंदी; ग्रामपंचायतीने घेतला मोठा निर्णय, जर कोणी 'असं' केल्यास फौजदारी गुन्हा होणार दाखल
Ganpatipule Beach
Ganpatipule Beach

गतवर्षी गणपतीपुळे समुद्रकिनारी (Ganpatipule Beach) मे महिन्याच्या अखेरीस समुद्राला मोठे उधाण आल्याने मोठ्या लाटांचा मारा किनाऱ्यावर होत होता. या मोठ्या लाटांच्या तडाख्यात गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांचे व हातगाडी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गतवर्षी या नुकसानग्रस्त स्टॉलधारकांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित स्टॉलधारकांना आपल्या सामंत कुटुंबीयांतर्फे वैयक्तिकरित्या मदत केली होती.

गतवर्षीची प्रचिती यंदाच्या पावसाळ्यात येऊ नये, तसेच कुठलाही मोठा धोका उद्भवू नये, यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या स्थानिकांना आगाऊ जाहीर नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. गणपतीपुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढू लागली आहे. यंदाही मोठ्या लाटा निर्माण होण्याची भीती स्थानिक व्यावसायिकांमध्ये आहे.

Ganpatipule Beach
Almatti Dam : 'अलमट्टी धरण' सांगली, कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण; कृष्णा कृती समितीचे महाराष्ट्राला 'हे' आवाहन

दरम्यान, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वॉटर स्पोर्टस्‌ व्यवसाय संबंधित व्यवसायिकांनी शनिवारपासून बंद केले आहेत. दरवर्षी गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्टस्‌ अँड बीच असोसिएशनच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस्‌ व्यवसाय सुरू आहे. या कालावधीत समुद्रात बुडणाऱ्या व्यावसायिकांचे प्राणही वाचवले जातात. आता वॉटर स्पोर्टस्‌ बंद ठेवण्यात आले आहेत.

गणपतीपुळे ग्रामपंचायतीने स्टॉलधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही नोटीस बजावली आहे. उधाणाच्या लाटांमध्ये नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून नोटीस बजावली आहे.

-संजय माने, गणपतीपुळे स्टॉलधारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com