रत्नागिरीत किराणा साहित्य मिळणार घरपोच

Grocers will get groceries in Ratnagiri
Grocers will get groceries in Ratnagiri

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था संघटनांचे एकत्रित संघटन असणाऱ्या हेल्पींग हॅन्डसच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी शहरात घरपोच किराणा साहित्य पोहचविण्यासाठी 64 दुकानदारांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे मिरकरवाड्यापासून कुवांरबाव आणि रेल्वेस्टेशन पर्यंतच्या नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान घरातचे राहणे शक्य होणार  आहे.


घरपोच धान्य सुविधेसाठी अत्यावश्यक मागणी नोंदवावी, अनावश्यक साठा टाळावा आणि शक्यतो e-payment चा वापर केला जावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 याच प्रकारची घरपोच अन्न धान्य पुरवठा व्यवस्था राजापूर, लांजा, मालंगुड, दापोली, सांडे लागवण, पानवळ, निवळी, टेंभ्ये, मंडणगड, गुहागर आदि ठिकाणी सुरु करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा आणि लॉकडाऊन मधून वगळण्यात आलेल्या इतर वाहतूकीची साधने यासाठी तहसीलदारांमार्फत परवाने जारी करण्यात आले आहे. या सर्वांसाठी जिल्हास्तवरावर नोडल अधिकारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हयात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची  संख्या 700  इतकी  असून जिल्हा शासकीय रुग्णालयात आज एकाला नव्याने  निगराणीखाली ठेवण्यात आले.

जिल्हयात 144 अंतर्गत  आधीचे 4 आणि नव्याने 1 असे एकूण 5  प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 
जिल्हयातील आंबा बागायतदार, फळबाज्या आणि दुध विक्री करणाऱ्या  एकूण ८९३ जणांना परवाने आज देण्यात आले. त्यामध्ये आंबा बागायतदार - ७९०, फळभाज्या -९८ आणि दुध - ५.

होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.           

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com