कोकणात सामुदायिक शेती ठरतेय फायद्याची; बचतगट महिलांचे प्रयोग यशस्वी

group farming of bachat gat women in konkan useful for economic conditions in ratnagiri
group farming of bachat gat women in konkan useful for economic conditions in ratnagiri

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील वेहेळे येथे बचत गटाच्या महिलांनी सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्‍यातील पाथर्डी-मिरवणे येथील बचत गटाच्या महिला व ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रकल्पास भेट दिली. रोजगारनिर्मितीसह आर्थिक समृद्धीसाठी असे प्रकल्प उपयुक्त असल्याचे मत सदस्य व महिलांनी व्यक्त केले.

वेहेळे राजवाडी येथे उपलब्ध पाण्याचा वापर करून बचत गटाच्या महिला सामूहिक शेती करीत आहे. बचत गटाच्या महिला, तसेच संस्था पदाधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती दिली. पाथर्डी-मिरवणेचे सरपंच नीलेश भडवळकर म्हणाले, ‘‘बचत गटाच्या महिलांनी सामुदायिक शेतीची, व्यावसायिक शेतीची कास धरावी. त्यांच्यात जनजागृती होण्यासाठी या क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले होते.’’ बचत गटाच्या ५० हून अधिक महिला उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली होती. या वेळी सरपंच नीलेश भडवळकर, उपसरपंच संजय भडवळकर, सदस्य मंगेश मोहिते, उदय भडवळकर, नेहा तांबे, अर्पिता धोपट, नम्रता गुडेकर, रूपाली भडवळकर, गंगाबाई जोयशी, जान्हवी साळवी, सीआरपी, तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

दुधी भोपळा, कार्ली, दोडका, कलिंगड... 

दिशांतर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाच्या महिला सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. महिलांनी कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळण्यासाठी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, मिरची, झेंडू, दुधी भोपळा, पडवळ, कार्ली, दोडका, पावटा, कलिंगड आदी विविध प्रकारची लागवड केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com