सध्याच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादक चिंतेत असून, शासनाने तातडीने यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ही या निवेदनात बागायतदार संघटनेने केली आहे.
कणकवली : शेती, बागायतीच्या विमा धोरणात (Crop Insurance Policy) सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील आंबा बागायतदार तसेच शेतकऱ्यांनी (Farmers) केली आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांना देण्यात आले.